राज्यात सामाजिक योजना आता ऑनलाईन

गोव्यात महिला व बाल कल्याण खात्याच्या विविध योजना आता ऑनलाईन पध्दतीने ऊपलब्ध करण्यात आल्या आहेत. महिला व बाल कल्याण खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी या गोवा ऑनलाईन पोर्टल सेवेचा शुभारंभ केला. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर गृहआधार, लाडली लक्ष्मी आदि सामाजिक योजनांचे अर्ज आता पोर्टलवर ऊपलब्ध होणार आहेत. योजनांचा लाभ घेणा-यानी आता कार्यालयात येण्याची गरज नाही, सर्व सेवा ऑनलाईन ऊपलब्ध होईल असे मंत्री विश्वजीत राणे यांनी या सेवेचा शुभारंभ केल्यानंतर बोलताना सांगितले.