भारताने चीन विरोधात उभं राहून आपली इच्छाशक्ती आणि क्षमता दाखवून दिली - लिसा कर्टीस

31072020_163456.JPEG

पूर्व लडाखमध्ये सीमारेषेवर भारताने चीनच्या आगळीकीला जे प्रत्युत्तर दिले, त्याचे अमेरिकेने कौतुक केले आहे. अलीकडेच सीमावादात भारताने चीन विरोधात उभं राहून आपली इच्छाशक्ती आणि क्षमता दाखवून दिली असे लिसा कर्टीस म्हणाल्या. त्या अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या दक्षिण मध्य आशियाच्या वरिष्ठ संचालक आहेत.पूर्व लडाखच्या सीमारेषेवर भारत-चीनमध्ये जे सुरु आहे, त्यावर इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांचे लक्ष आहे. भारताने जो दृढ संकल्प दाखवला त्यातून या देशांना नक्कीच प्रेरणा मिळेल” असे लिसा कर्टीस म्हणाल्या. बुधवारी ब्रुकिंग्स इन्स्टिट्यूशनच्या वेबिनारमध्ये बोलताना त्यांनी हे विचार व्यक्त केले.दोन्ही देशांमध्ये तणाव कमी होतोय ही चांगली गोष्ट आहे. पण नियंत्रण रेषेवर चीनने भारतावर जो दबाव आणला, त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत असे त्या म्हणाल्या. “जगाच्या अन्य भागांमध्ये चीन ज्या पद्धतीने आक्रमकता दाखवतो, लडाखमध्ये सुद्धा तोच पॅटर्न होता” असे त्यांनी सांगितले.