34 c Kolhapur
महत्वाच्या घडामोडी

नाथाचं रूप घेऊन रावण कृत्य करणाऱ्या बोगस पत्रकारावर कारवाई करा

M

कोल्हापूर : २८ एप्रिल रोजी रात्री ९ वाजून ४५ मिनिटाच्या सुमारास आयसोलेशन हॉस्पटल येथे मारहाणीच्या घटनेशी काहीही संबंध नसताना एक बोगस पत्रकार आणि सहकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी संगनमत करून मारामारीच्या गुन्ह्यात नाव गोवणाऱ्या संबंधित पत्रकार आणि त्याच्या सहकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन जवाहरनगर येथील उद्योगपती नईम कच्छी यांनी कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे याना सादर केले आहे. फ्लॅट बळकावणे , फसवणूक , विनयभंग अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेला आणि एका नामांकित वृत्तपत्राने हकालपट्टी केलेला बोगस पत्रकार ऑनलाईन पोर्टलच्या नावाखाली पोलिस अधिकाऱ्यांशी असलेल्या जवळीकीचा गैरफायदा घेत शहरातील नामांकित आणि उच्चभ्रू उद्योगपतींशी आर्थिक आमिषापोटी मैत्री करून त्या उद्योगपतींना ब्लॅकमेल करण्याचे षडयंत्र रचण्यात माहीर आहे. त्याच्या या कृष्णकृत्यांमुळेच शहरातील एका नामांकित वृत्तपत्रासह नव्या गतीने सुरु झालेल्या वृत्तसंस्थेला देखील लाखोंचा गंडा घातल्याची चर्चा माध्यम क्षेत्रासह शहरवासियांमध्ये रंगली आहे. नाथाचं रूप घेऊन रावणाचं कृत्य करणाऱ्या या बोगस पत्रकारावर कोल्हापूर पोलिसांनी सर्व बाजूंची चौकशी करत या पत्रकारावर कडक कारवाई करावी अशी मागणी नईम कच्छी यांनी केली आहे. दि २८ एप्रिल रोजी शहरातील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरातमध्ये रात्री पावणेदहाच्या सुमारास झालेल्या मारामारीशी काहीही संबंध नसताना सदर गुन्ह्यामध्ये नईम कच्छी याना आरोपी करण्यात आले आहे. मात्र या घटनेच्या वेळी नईम कच्छी हे जवाहरनगर येथील शिरत मोहल्ला मशिदीमध्ये नमाज पठाण करत होते.हे त्या मशिदीमधील सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद देखील आहे. असे असताना सुद्धा संशयाची सुई पोलिसांच्याकडे देखील वळत असल्याचे दिसून येते. घटनेनंतर फिर्यादी अमोल बारामते याने राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानतंर काही पोलीस कर्मचाऱ्यांनी कच्छी यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नी आणि आई याना दमदाटी करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. घटनेची कोणतीही चौकशी न करता संशियतच्या घरी जाऊन दमदाटी करणाऱ्या पोलिसांच्या या भूमिकेचीदेखील चौकशी व्हावी अशी मागणी कच्छी यांनी निवेदनात केली आहे.

Read Previous

शूटिंग रायफल, अग्निशमन, हस्तकला, समुपदेशनमध्ये रमले विद्यार्थी

Read Next

लोकाभिमुख होण्याबरोबरच पालकांचीही काळजी घ्या