34 c Kolhapur
कोल्हापूर

लोकाभिमुख होण्याबरोबरच पालकांचीही काळजी घ्या

M

कोल्हापूर : सामान्य माणसांप्रती आत्मियता बाळगा, आपल्याकडे येणाऱ्यांचे काम त्वरीत करुन त्याला कामातून दिलासा द्या, सर्वसामान्यांशी आदरपूर्वक वागा, ज्यांच्यामुळे आपणास शासकीय सेवा मिळाली आहे, त्यांना विसरु नका, लोकाभिमुख होण्याबरोबरच पालकांचीही काळजी घ्या, असा प्रेमाचा सल्ला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज जिल्हा परिषद येथे अनुकंपा तत्वावरील कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे आदेश वितरण कार्यक्रमात दिला. जिल्हा परिषदेमार्फत अनुकंपा तत्वारील 62 कर्मचाऱ्यांना सोमवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते नियुक्तीचे आदेश वितरीत करण्यात आले. यावेळी बोलताना ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, आपले कर्तव्य बजावताना सामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवावे. ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या कामाबाबत समाधान वाटावे, अशी सेवा करा. नजिकच्या काळात जिल्हा परिषदेमधील रिक्त पदांची भरती करण्यात येणार असून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमार्फत भरती करण्यात येणार असल्याचे सांगून मुश्रीफ यांनी अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले कि, नेमणुकीच्या ठिकाणी प्रमाणिक सेवा बजावून सर्वसामान्यांच्या हिताला प्राधान्य द्या. हयात असलेल्या आपल्या पालकांची काळजी घेण्याबरोरबच कुटुंबातील इतर सदस्यांचीही काळजी घ्या, असेही पालकमंत्री पाटील यावेळी म्हणाले.जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात झालेल्या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांच्यासह, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, माजी सभापती रसिका पटील यांच्यासह जिल्हा परिषदेमधील अधिकारी, कर्मचारी व अनुकंपा तत्वारील नियुक्ती मिळालेले कर्मचारी उपस्थित होते.

Read Previous

नाथाचं रूप घेऊन रावण कृत्य करणाऱ्या बोगस पत्रकारावर कारवाई करा

Read Next

आता तरी गृहमंत्रिपदाचा हिसका दाखवा...