34 c Kolhapur
पुणे

सातारानंतर पुणे पोलीस सदावर्ते यांना अटक करण्याची शक्यता

M

वेब टीम : गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सातारा पोलिसानंतर आता पुढे पुणे पोलिसही गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्याची शक्यता आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात 9 सप्टेंबर 2020 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पुणे पोलीस त्यांना अटक करण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुण्यातील कात्रज परिसरात राहणारे ३५ वर्षीय अमर पवार यांनी सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. अमर पवार मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणून काम पाहतात. सदावर्ते यांनी 7 ऑक्टोबर 2020 रोजी एका वृत्तवाहिनीवर बोलत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ही तक्रार देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा वंशजांचा एकेरी उल्लेख करुन सकल मराठा समाजाचा अपमान होईल व जाती-पाती मधे तेढ निर्माण होऊन दंगल भडकेल अशा प्रकारचे शब्द वापरल्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे. त्यामुळे पुणे पोलीसही या गुन्ह्यात सदावर्ते यांना अटक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read Previous

आता तरी गृहमंत्रिपदाचा हिसका दाखवा...

Read Next

मुश्रीफांचा जन्म रामनवमीला नव्हे, तर रंगपंचमीला