34 c Kolhapur
कोल्हापूर

मुश्रीफांचा जन्म रामनवमीला नव्हे, तर रंगपंचमीला

M

कोल्हापूर : कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या निमित्त छापण्यात आलेल्या बॅनरवरुन हा वाद निर्माण झाला आहे. भाजप जिल्हाध्याक्ष समरजीत घाटगे यांनी कागल मध्ये मोर्चा काढला असून यावेळी मुश्रीफ यांचं नाव प्रभु रामांचं नाव जोडल्याने व श्री रामाच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्याने मुश्रीफांवर भाजप जिल्हाध्याक्ष समरजीत घाटगे यांनी जोरदार टीका केली आहे. यावेळी बोलताना समरजीत घाटगे यांनी मुश्रीफआंचा जन्म रामनवमीला झाल्याचा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. मुश्रीफांचा जन्म रामनवमीला नाही तर रंगपंचमीला झाला, असं म्हणत मुश्रीफांवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना समरजीत घाटगे म्हणाले, मुश्रीफ यांनी सांगितलं होतं की 1954 ला त्यांचा जन्म रामनवमीला झाला हे खोटं आहे. तुम्ही 40 वर्ष जनतेशी खोटं बोलले आहे मुश्रीफांचा जन्म 24 मार्च 1954 रोजी झाला. त्या दिवशी रामनवमी नाही तर रंगपंचमी होती. यावेळी बँकेला सादर केलेले पुरावे घाटगेंकडून सादर करण्यात आले. दरम्यान, समरजित घाटगे यांच्या आरोपांना मुश्रीफ यांनी उत्तर दिलंय. हे सगळं प्रकरण समरजित घाटगे यांना महागात पडणार असा इशारा मुश्रीफ यांनी दिला आहे. मी माझ्या कार्यकर्त्यांना संयम राखण्याचं आवाहन केलं आहे. अन्यथा ते आमच्या पासंगाला देखील पुरणार नाहीत, असं देखील दम मुश्रीफ यांनी दिलाय. गेल्या 50 वर्षांपासून मी रामनवमीला वाढदिवस साजरा करतोय. मग आताच यांच्या पोटात का दुखत आहे, असा सवाल देखील केला आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या व्यक्तीला राजकारण काय कळणार असा टोलादेखील मुश्रीफ यांनी यावेळी लगावला आहे.

Read Previous

सातारानंतर पुणे पोलीस सदावर्ते यांना अटक करण्याची शक्यता

Read Next

संजय राठोड यांच्यासाठी पोहरादेवी महंत आक्रमक